News Flash

करोनावर मात करण्यासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय नाही, केंद्राने केलं स्पष्ट

लस हाच करोनावर मात करण्याचा एकमेव मार्ग...

भारतातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, करोना व्हायरसची साथ रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. लस हाच करोना व्हायरसवर मात करण्याचा मार्ग आहे असे सरकारचे मत आहे.

“हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

खूप लोक एखाद्या रोगाचा संसर्ग होऊन बरे होतात तेव्हाही त्यांच्यामध्ये त्या रोगाविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण खूप लोक असं म्हणताना तिथे लोकसंख्येच्या संदर्भात विशिष्ट आकडेवारी अपेक्षित असते. त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात.

मुंबई आणि दिल्ली या मोठया शहरांमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेमध्ये अनेकांना करोनाची बाधा होऊन गेल्याचे समोर आले. दिल्लीत लोकसंख्येच्या एका मोठया गटामध्ये अँटी बॉडीज आढळल्या. म्हणजे तिथे नागरिकांना करोनाची लागण झाली आणि ते त्यातून बरे सुद्धा झाले.

मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे. निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आलं.

दरम्यान, या तीन विभागांतील ६ हजार ९३६ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यातआले. तसंच झोपडपट्टीतील निर्धारित लक्ष्यापैकी अधिक तर बिगरझोपडपट्टी भागांतील ७० टक्के रहिवाशी सहभागी झाले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याची माहिती समोर आली. या आठवडयात भारतात करोना व्हायरसची रुग्ण संख्या १५ लाखाच्या पुढे गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 5:34 pm

Web Title: covid 19 herd immunity not an option in a country like india says centre dmp 82
Next Stories
1 “देशातल्या १६ राज्यांचा रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही चांगला”
2 टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित
3 तालिबानी दहशतवादी भारतात हल्ल्याच्या तयारीत, अयोध्या राम मंदिरही निशाण्यावर