देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे करोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे हात टेकले आहेत. शनिवारी देशातील करोना रुग्णांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली. तर देशात आत्तापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात या करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

आणखी वाचा- चिंता वाढली; २४ तासांत आढळले सर्वाधिक रुग्ण, एकूण करोनाबाधितांची संख्या पाच लाखांच्या पुढे

कोविड १९ चा प्रादुर्भाव हा देशातल्या इतर भागांमध्येही वेगाने वाढतो आहे. करोनाचा मुकाबला करुन त्याला हरवणार अशा वल्गना दिल्या गेल्या प्रत्यक्षात मोदी सरकारकडे यासाठीचे कोणतेही धोरण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे हात टेकले आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.