करोनामुळे अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड भार पडला. त्यामुळे सर्वत्र बेड, ऑक्सिजन, तसेच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजन आणि औषधीअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत असून, भारतातील परिस्थितीबद्दल जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील परिस्थिती बिकट झाल्याने परदेशातील राष्ट्रांकडून मदत पाठवली जात आहे. या मदतीवरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह विविध औषधी आणि करोना साहित्याची टंचाई निर्माण झाली. रुग्ण आणि नातेवाईकांना बेड आणि ऑक्सिजन सिलेंडरसाठी हाल सोसावे लागत असून, देशभरात ऑक्सिजनची ओरड होत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याने जगभरातील विविध देशांनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, ही मदत अद्याप दिली गेली नसल्याचा आरोप आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

आणखी वाचा- “नरेंद्र मोदींना भारतातलं करोनाचं संकट रोखता आलं असतं, पण…”, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोदींवर परखड टीका!

“भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून ३०० टन मदत मिळाली आहे. पण या मदतीचं काय केलं? याची माहिती पंतप्रधान कार्यालय आपल्याला देत नाहीये. नोकरशाहीच्या नाटकामुळे जीव वाचवणारी किती साहित्य सामुग्री अडकून पडली आहे? ही अकार्यक्षमता नाहीये, तर पूर्णपणे आपल्या नागरिकांविषयीची असंवेदनशीलता आहे,” असं म्हणत ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “नेतृत्व आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती उद्भवली”, RBI माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचं टीकास्त्र

“तुम्ही आंधळे असू शकता, आम्ही नाही”

दिल्लीत करोनामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीत रुग्णांना जीव गमवावा लागत असून, या प्रकरणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. “देशात करोनासंदर्भातील जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल तुम्ही आंधळेपणाचं नाटक करु शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्र सरकारनं डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही असं करु शकत नाही,” असं म्हणत न्यायालयाने केंद्राचे कान धरले.