27 October 2020

News Flash

करोनाचा धोका कायम; नोव्हेंबरमध्ये गाठणार उच्चांक; आयसीयू बेड, व्हेटिंलेटर्सच्या तुटवड्याची शक्यता

आयसीएमआरच्या अभ्यासातील निष्कर्ष

करोनानं जगभरात मृत्यूचं थैमान घातलं असून, भारतातही परिस्थिती चिंताजनक आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत असला, तरी करोनाचं संकट अजूनही कायम आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.

देशातील करोनाचा ज्वर अजूनही कमी झालेला नाही. लॉकडाउनमुळे काही प्रमाणात करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला होता. मात्र, लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दिवसाला सरासरी १०,००० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

‘पीटीयआय’नं याबाबत वृत्त दिलं आहे. देशातील करोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरनं संशोधकांचा समावेश असलेला ऑपरेशन रिसर्च ग्रुप स्थापन केला होता. देशात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीला करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठू शकते. या काळात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो, असं या ग्रुपनं केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. देशात लागू करण्यात आलेल्या आठ आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे उच्चांक गाठण्याचा कालावधी ३४ ते ७४ दिवस लांबला आहे. त्यामुळे संक्रमणाची संख्या ६९ ते ९७ टक्क्यांनी कमी करण्यास मदत झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास वेळ मिळाला आहे,” असं या अभ्यासात म्हटलं आहे.

लॉकडाउननंतर करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढायला लागली आहे. त्यात देशातील काही भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावाही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. सरकारनं ही बाब स्वीकारली, तर लोक अधिक सावध होतील व काळजी घेतील, अशी सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2020 7:33 pm

Web Title: covid 19 peak in country may arrive mid nov paucity of icu beds ventilators likely bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुशांतची आत्महत्या; कुटुंबीयांना अश्रू अनावर, घराबाहेर नागरिकांची गर्दी
2 “आमची कधी भेट झाली नव्हती, पण…”; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना
3 “जेव्हा सरकारचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा ते पत्रकार आणि बुद्धिजिवींवर गुन्हे दाखल करते”
Just Now!
X