27 September 2020

News Flash

‘शक्य असेल ती सर्व मदत करु’, पंतप्रधान मोदींचा इजिप्त, दक्षिण आफ्रिकेला शब्द

करोना व्हायरसविरोधातील लढाईत भारत जगातील वेगवेगळया देशांना औषधांचा पुरवठा करत आहे.

करोना व्हायरसविरोधातील लढाईत भारत जगातील वेगवेगळया देशांना औषधांचा पुरवठा करत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

“करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा कसा सामना करायचा, याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली. भारताकडून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे मी त्यांना आश्वासन दिले आहे” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन दिली.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर सुद्धा पंतप्रधान मोदींनी करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाबद्दल चर्चा केली. “अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर Covid-19च्या भारत आणि इजिप्तमधील स्थितीबद्दल चर्चा झाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरु आहेत, त्याला भारत आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत करेल” असे मोदींनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे.

आणखी वाचा- Coronavirus: संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’, जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

सरकारनं ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 8:35 am

Web Title: covid 19 pm assures support to south africa egypt for essential medical supplies dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन विरोधात हाती AK-47 घेऊन अमेरिकन नागरिक उतरले रस्त्यावर
2 धक्कादायक! लॉकडाउनचा फायदा घेत ५३ वर्षीय अंध महिलेवर घरात घुसून अज्ञाताकडून बलात्कार
3 Coronavirus Updates: देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजाराच्या पुढे
Just Now!
X