News Flash

करोनाची लागण झालेल्या नर्सेसची जिद्द पाहून मुख्यमंत्रीही भारावले, ट्विट करत म्हणाले…

करोनाबाधित नर्सेसनी विलगीकरण केंद्रातून दिली परीक्षा

करोनाची लागण झालेल्या नर्सेसची जिद्द पाहून मुख्यमंत्रीही भारावले, ट्विट करत म्हणाले…

करोनाची लागण झाली असतानाही दोन परिचारिकांनी जिद्द दाखवत रुग्णालयातून परीक्षा दिल्याची एक घटना समोर आली आहे. पंजाबच्या पटियाला येथील रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या या परिचारिकांनी दाखवलेल्या जिद्दीचं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही कौतुक केलं आहे. करोनामुळे डॉक्टर, नर्स आणि अधिकारी दिवस-रात्र रुग्णालयांमध्ये राबत आहेत. जीव धोक्यात घालून हे करोना योद्धे रुग्णांवर उपचार करत आहेत. यामधील अनेकांना करोनाची लागणही झाली आहे.

करोनाची लागण झालेल्या दोन्ही परिचारकांनी विलगीकरण कक्षातून परीक्षी देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. “करोनाची लागण झालेल्या या दोन्ही परिचारिकांच्या जिद्दीला सलाम आहे. त्यांची निराशा न करता सरकारने विलगीकरण कक्षातून परीक्षा देण्याची परवानगी दिली होती,” असं ट्विट अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी : पतंजलीचं करोनावरील आयुर्वेदिक औषध लाँच

पंजाबमध्ये आतापर्यंत ४२३५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. २८२५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं असून २१ हजार ३०० जण क्वारंटाइन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 2:47 pm

Web Title: covid 19 positive nurses appeared for exam from quarantine facility in punjab sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांचा लालू प्रसाद यादव यांना धक्का
2 गुजरात : तटरक्षक दलाची कारवाई, १ कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ हस्तगत
3 खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर भर कार्यक्रमात भोवळ येऊन खाली कोसळल्या, रुग्णालयात दाखल