News Flash

करोनावर मात केलेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीचा संसर्ग, देशातील पहिलंच प्रकरण; मुंबईत उपचार सुरु

काळ्या बुरशीची लागण झाल्याचा संशय आल्याने तपासणी केली असता हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न

काळ्या बुरशीची लागण झाल्याचा संशय आल्याने तपासणी केली असता हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न (File Photo: PTI)

करोनावर मात केलेल्या ३४ वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे. आपल्याला म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने रुग्णाने चाचणी केली असताना ही माहिती समोर आली.

श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SAIMS) छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा रुग्ण करोनामधून बरा झाला होता. दरम्यान त्याला आपल्याला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता याउलट फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं”.

समजून घ्याः भारतातच का वाढत आहे काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव?

करोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचं डॉक्टर रवी दोशी यांनी म्हटलं आहे.

या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसात १०० टक्के करोना संसर्ग झाला असल्याने जवळपास एक महिना त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. पण करोनामधून बरं झाल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त वाहत होतं तसंच खूप ताप येत होता. वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणाही आला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस असण्याची शक्यता आहे. दरम्यान रुग्णाला सध्या मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 8:09 am

Web Title: covid 19 recovered patient diagnosed with green fungus infection in indore sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गाझियाबाद : जय श्री राम घोषणा नाही तावीजवरुन मारहाण; UP पोलिसांनी Twitter सहीत ९ जणांविरोधात दाखल केला दंगलीचा गुन्हा
2 अखेर ट्विटरकडून  अनुपालन अधिकारी नियुक्त
3 Coronavirus vaccine registration : ‘कोविन’सक्ती रद्द!
Just Now!
X