News Flash

COVID-19 : सानिया मिर्झा करणार हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक मदत

करोनाच्या तडाख्यातून गरीब जनतेला देणार मदतीचा हात

करोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या कसोटीच्या काळात रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असलेल्या कामगारांवर वाईट वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आता टेनिसस्टार सानिया मिर्झा सरसावली आहे.

COVID-19 : T20 World Cup जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचं कर्तव्य

हातावर पोट असणाऱ्यांवर सध्या करोनाच्या तडाख्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पुढाकार घेतला आहे. सानियाने रोजंदारी कामगारांना जेवण आणि मुलभूत गरजेच्या वस्तू पुरवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी तिने एक चळवळ उभी केली आहे. ”संपूर्ण जग सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आपण घरी सुरक्षित आहोत हे आपलं नशीब आहे. पण अनेकांचे यामुळे नुकसान होत आहे. हातावर पोट असणाऱ्यांना अतिशय कठीण दिवस आहेत. त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपापल्या परीनं त्यांना मदत करण्याची हीच वेळ आहे,” असे सानियाने सांगितले आहे.

CoronaVirus : लॉकडाउनच्या निर्णयाचे विराटकडून समर्थन; हरभजननेही दिला महत्त्वाचा सल्ला

दरम्यान, भारतात देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. तर पाचशेहून अधिक लोकं करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 12:43 pm

Web Title: covid 19 sania mirza joins battle against coronavirus breakout helps raise funds for daily wage workers social responsibility vjb 91
Next Stories
1 WHO कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, UN ने भारताला दिला हा संदेश
2 … तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
3 नवं संकट : सुनामीचा इशारा
Just Now!
X