देशातला करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या नवबाधितांची संख्या ही बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमीच आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही एक हजाराच्या खाली आली आहे.

गेल्या २४ तासातले करोनामुक्त आणि नवबाधित

काल दिवसभरात देशात ४५ हजार ९५१ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार ६४ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात ६० हजार ७२९ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ९४ लाख २७ हजार ३३० वर पोहोचली आहे.

करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या

देशात काल दिवसभरात ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता तीन लाख ९८ हजार ४५४ वर पोहोचली आहे.

लसीकरण आकडेवारी

देशात काल दिवसभरात ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.