News Flash

करोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा; २४ तासांमध्ये १३५८ जणांचा मृत्यू

देशात सलग ४१ दिवसांत नव्या बाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. (संग्रहीत छायाचित्र)

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना भारतात आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशात देशातील करोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये तीन लाख ९० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १३५८ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच सलग ४१ दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ६८ हजार ८१७ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत १९,३२७ रुग्णांची घट झाली आहे. सोमवारी ४२,६४० करोना रुग्ण आढळले होते.

हे ही वाचा >> vaccination in india : लसीकरणाचा वेग मंदावला

आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांची करोनावर मात

देशात आतापर्यंत ३ कोटी २८ हजार ७०९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात करोनामुळे ३ लाख ९० हजार ६६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. २२ जूनपर्यंत देशात २९ कोटी ४६ लाख नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याआधी ५४ लाख २४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. तर आतापर्यंत ३९ कोटी ५९ लाखांपेक्षा जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> Covid vaccine: करोना मृत्यू रोखण्यासाठी लसींचा पहिला आणि दुसरा डोस ८२ आणि ९५ टक्के प्रभावी

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये डेल्टा प्लसचे २२ रुग्ण

केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 10:35 am

Web Title: covid 19 update in india coronavirus deaths active cases patient number crossed the three crore mark 1358 deaths in 24 hours abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Covid vaccine: करोना मृत्यू रोखण्यासाठी लसींचा पहिला आणि दुसरा डोस ८२ आणि ९५ टक्के प्रभावी
2 गलवानमधील संघर्षानंतर चिनी सैन्याला अधिक चांगल्या प्रशिक्षणाची गरज भासत आहे – बिपीन रावत
3 पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना दिलं जातं पेन्शन; UNHRC मध्ये भारताचा पाकवर हल्लाबोल
Just Now!
X