News Flash

Coronavirus: देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ७३ दिवसात प्रथमच आठ लाखांच्या खाली

आकडे कमी होतायत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही, त्यामुळे करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करा

...तर आम्ही प्रभावी रुग्णसेवा कशी द्यायची? असा सवाल आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. (संग्रहीत छायाचित्र)

देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. देशातल्या नवबाधितांची, मृतांची संख्या हेच सांगतेय. अद्यापही करोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणारी संख्या ही आशादायी बाब आहे. गेल्या ७३ दिवसांत प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली आली आहे.

नव्या बाधितांची संख्याः

देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ४८० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ९८ हजार ६५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ही संख्या कायम आठ लाखांच्या वरच होती. मात्र, गेल्या ७३ दिवसांत पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे.

करोनामुक्त आणि मृतांची आकडेवारीः

तर काल दिवसभरात ८८हजार ९७७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या आता दोन कोटी ८५ लाख ८० हजार ७४७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या १ हजार ५८७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांची एकूण संख्या आता तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे.

लसीकरणः

देशात गेल्या २४ तासात ३२ लाख ५९ हजार ३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी पहिला डोस २८ लाख ५४ हजार २२० नागरिकांनी घेतला. तर चार लाख ४ हजार ७८३ जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 9:57 am

Web Title: covid 19 update in india coronavirus deaths active cases vaccinations in india vsk 98
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 अमित शाहांना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चुकीची माहिती दिली; सोवन चॅटर्जी यांचा दावा
2 अजब! हातात टोपली आणि डोक्यावर प्लास्टिक स्टूल घेऊन आंदोलकांशी भिडले; पोलिसांचे फोटो व्हायरल
3 ९८० कोटींची कर्ज माफ; ‘या’ राज्यातील २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
Just Now!
X