News Flash

Coronavirus: देशात एका दिवसातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद, बाधितांच्या संख्येतही वाढ

नवी आकडेवारी चिंताजनक, त्यामुळे अधिक काळजी घ्या, मास्क वापरा, स्वच्छता पाळा, सुरक्षित अंतराचे नियम पाळा...

देशात काल दिवसभरात एका दिवसातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. (फोटो सौजन्यः रॉयटर्स)

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.

देशातल्या करोना मृत्यूंची आकडेवारी

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दैनंदिन करोनाबाधितांची संख्या

देशातल्या दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या करोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

आणखी वाचा- Covid 19: लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

लसीकरणाची आकडेवारी

देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 10:46 am

Web Title: covid 19 update in india today highest death in one day reportes vsk 98
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 अमेरिकेत TikTok वरील बंदी उठली; मोदी सरकारही बायडन यांच्या पावलावर पाऊल टाकणार?
2 Lockdown Impact: घर चालवण्यासाठी मुलगी झाली डिलीव्हरी बॉय
3 लसींची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार करणार घासाघीस
Just Now!
X