News Flash

Covid 19 vaccine: क्लिनिकल ट्रायल डेटा खुला करा; याचिकेवर सुप्नीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

करोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती

Supreme Court
सर्वोच्च न्यायालय (संग्रहीत छायाचित्र)

करोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागितले आहे. यासह, लोकांना लस घेण्यास भाग पाडले जात आहे का?, असा सवालही न्यायालयाने केला आहे. तसेच जबरदस्तीने लसीकरण करू नये किंवा लस न घेतल्याने कोणालाही नोकरी वरुन काढू नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता चार आठवड्यांनी होईल. याबाबत जेकब पुलीयल यांनी याचिका दाखल केली होती. लोकांना क्लिनिकल ट्रायल विषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच लसीकरणानंतर समस्या आणि धोके काय आहेत हे देखील माहित असले पाहिजे, अशी मागणी जेकब पुलीयल यांनी याचिकेत केली होती.

याचिकाकर्त्याचे वकील प्रशांत भूषण म्हणाले की, लसीच्या चाचणीचा डेटा सार्वजनिक न करता इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीच्या आपत्कालीन स्थितीत वापराला मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दोन मागण्या करण्यात आल्या. पहिली म्हणजे करोना लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक केला पाहिजे. दुसरे म्हणजे हे सुनिश्चित करा की कोणालाही करोनाची लस घेण्यास जबरदस्तीने भाग पाडले जात नाही. या दोन्ही प्रश्नांवर केंद्र सरकारला उत्तर दाखल करावे लागेल. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ते लसीच्या परिणामावर कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाहीत. सरकारला नोटीस जारी केल्याचा अर्थ असा नाही की लसीवर शंका आहे.

 लस पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही?

सरकारने हा डेटा सार्वजनिक करावा, अशी मागणी जनहित याचिकेने केली आहे. हे सांगितले पाहिजे की लसीची किती लोकांवर चाचणी केली गेली आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत. हे पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही? याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सर्व गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनात शंका कायम राहतील. सर्वोच्च न्यायालयाने यावर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे जेणेकरून पारदर्शकता कायम राहील. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले की सध्याच्या परिस्थिती फारसे प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. आजही लोक करोनामुळे मरत आहेत. करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लस हे एकमेव शस्त्र आहे, असे सरकार म्हणत आहे. तरीही सरकारने आपली भूमिका घ्यावी, अशी आमची इच्छा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2021 2:07 pm

Web Title: covid 19 vaccine supreme court notice to central government about open clinical trial data srk 94
Next Stories
1 जेव्हा कुंपणच शेत खातं; रेल्वे विद्यापीठानं संचालकालाच दिलं सहा कोटींचं कंत्राट
2 दिल्लीत ओबीसी आरक्षणावरुन मोठी घडामोड; घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा विरोधकांचा निर्णय
3 सकाळी उठले तर अंगावर एकही कपडा नव्हता; अलिबाबाच्या महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचारामुळे खळबळ
Just Now!
X