करोनाने जगात हाहाकार केला आहे. दुसऱ्या लाटेत जगात चक्क मृत्यू तांडव सुरु होता. अजुनही संपुर्ण जग करोनाचा सामना करत आहे. करोनाचा फैलाव सर्वात आधी चीनमध्ये झाला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून करोना विषाणूने जगभरात विनाश केला आहे. करोनामुळे आतापर्यंत जगभरात कोट्यावधी लोकांना संसर्ग झाला आहे आणि लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु आतापर्यंत जगाला या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही, करोना विषाणूची उत्पत्ति कशी झाली? दरम्यान, जगाला संशय असलेल्या चीनच्या वुहानमधील त्याच प्रयोगशाळेत करोना विषाणू बनविला गेला होता, आता अमेरिकन प्रयोगशाळेच्या अहवालानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे.

अमेरिका सरकार करोना विषाणूवर संशोधन करीत आहे. चीनमधील वुहान लॅबमधून करोना विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार हा अभ्यास कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीने मे २०२० मध्ये सुरू केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राज्य विभागाने व्हायरसच्या मूळ स्रोताच्या तपासणीचे आदेश दिले होते. लॉरेन्स लिव्हरमोरचे मूल्यांकन कोविड-१९ विषाणूच्या जीनोमिक विश्लेषणावर आधारित आहे.

हेही वाचा – Covid 19: चीनमधील खाण, कामगारांचा मृत्यू आणि RaBt-CoV चं रहस्य…; पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

चीनवर दबाव कायम ठेऊ

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान म्हणाले, कोविड -१९ च्या उत्पत्तीविषयी माहिती देण्यासाठी आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासह चीनवर दबाव कायम ठेऊ. तसेच अमेरिका आपल्या स्तरावर आढावा व प्रक्रिया सुरू ठेवेल.

“आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला सोबत घेऊन चीनवर दबाव कायम ठेऊ. त्यामुळे चीन डेटा व माहिती देत राहिल. जर याबाबत चीनने नकार दिला. तर असे मुळीचं होणार की, आपण फक्त उभे राहून हे पाहत बसू आणि त्यांचे म्हणने स्वीकारू” असे जॅक सुलिवान म्हणाले.