News Flash

WHO ला लाज वाटली पाहिजे, चीनची PR एजन्सी असल्यासारखा कारभार, ट्रम्प यांचा हल्लाबोल

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर हल्लाबोल केला आहे. जा

करोना व्हायरसच्या संकटासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जबाबदार धरले आहे. ते सातत्याने या दोघांना लक्ष्य करत आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर हल्लाबोल केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

करोना व्हायरसचा होणारा फैलाव आणि त्याचे परिणाम WHO ने वेळीच लक्षात आणून दिले नाहीत असा ट्रम्प यांचा आरोप आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी सुद्धा बंद केला आहे. करोना व्हायरसच्या संकटात WHO ने नेमके काय काम केले? त्यांची भूमिका काय होती? त्याची चौकशी ट्रम्प प्रशासनाने सुरु केली आहे. “जागतिक आरोग्य संघटना चीनसाठी पब्लिक रिलेशन एजन्सी असल्यासारखे काम करत आहे. त्यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात ट्रम्प यांनी WHO वर हल्लाबोल केला. व्हाइट हाऊसच्या इस्ट रुममध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

आणखी वाचा- अमेरिका करोनाच्या विळाख्यात; ६३ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर १० लाखांपेक्षा अधिक जणांना संसर्ग

अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला वर्षाला ५० कोटी डॉलरचा निधी दिला जातो. तेच चीनकडून वर्षाला फक्त ३८ लाख डॉलर्स दिले जातात याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. “लोक भयंकर चुका करतात तेव्हा त्यांनी कुठल्याही सबबी किंवा कारणे देऊ नयेत. त्या चूकांमुळे लाखो लोक आपले प्राण गमावत आहेत. माझ्या मते जागतिक आरोग्य संघटनेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे” असे ट्रम्प म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 11:59 am

Web Title: covid 19 who like public relations agency for china should be ashamed donald trump dmp 82
Next Stories
1 लॉकडाउननंतर आज पहिली विशेष रेल्वे धावली; कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी निर्णय
2 अल्कोहोलने हात धुतल्यावर करोना मरत असेल, तर दारु प्यायल्याने घशात नक्कीच मरेल; आमदाराचं पत्र
3 देशात करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजारांवर; १ हजार १४७ जणांचा मृत्यू
Just Now!
X