News Flash

बिहार : “कोणीतरी माझी ओढणी ओढत होतं, मी मागे वळले तेव्हा…”; करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीची कर्मचाऱ्यांनी काढली छेड

या महिलेच्या पतीचं उपचारादरम्यान निधन झालं

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : पीटीआय)

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलाय. आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण आला असून ऑक्सिजन, औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पळापळ करावी लागत असल्याचं चित्र दिसत आहे. याच साऱ्यामध्ये एकमेकांच्या मदतीला पुढे आलेल्या काही सामान्यातील सर्वासामान्यांच्या मदतीच्या बातम्या प्रेरणा देणाऱ्या आहेत. मात्र या संकटाच्या परिस्थितीमध्येही लोकांचा गैरफायदा घेणारेही दिसून येत आहेत. बिहारमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील सरकारी आणि खासगी सर्वच रुग्णालयांमध्ये करोनामुळे खूपच गोंधळ उडाला असून रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी नातेवाईकांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. बिहारमधील भागलपूर आणि पाटणा येथील रुग्णालयांमध्ये मधुबनी येथे राहणाऱ्या महिलेला अशाच कटू अनुभव आला. करोना पॉझिटिव्ह पतीवर उपचार करण्यासाठी गेलेल्या या महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आला. इतकचं नाही तर रुग्णालयामध्ये माझी छेड काढण्यात आली असा आरोपही या महिलेने केला आहे. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलेच्या पतीचं निधन झालं तर दुसरीकडे रुग्णालयात माझ्यासोबत छेडछेडा झाल्याचा आरोप या महिलेने केलाय.

नक्की वाचा >> धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या पाच तासांमध्ये नवविवाहितेचा मृत्यू

या पीडित महिलेच्या पतीला होळीच्या आसपास करोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याला भागलपूरमधील ग्लोकल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे या महिलेला आपल्या पतीकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नीट लक्ष द्यावं म्हणून सतत त्यांच्या मागे लागून काम करुन घ्यावं लागायचं. अनेकदा या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माझी छेड काढल्याचा आरोप या महिलेने केलाय. रुग्णालयामध्ये फार वाईट वागणूक आम्हाला देण्यात आल्याचं या महिलेने म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये अनेकदा कर्मचारी जागेवर उपलब्ध नव्हते, औषधं वेळेत दिली जात नव्हती. करोना वॉर्डमध्ये असणारे माझे पती अनेकदा हातानेच पाण्यसाठी इशारा करायचे पण त्यांना कोणी पाणीही द्यायचे नाही, असा आरोप या महिलेने केलाय.

“एकदा पतीशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी माझी ओढणी खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला वाटलं. ते पाहून माझी आई जोरात ओरडली. मी मागे वळले तर एका कर्मचाऱ्याने माझा हात पकडला आणि तो हसू लागला. मी माझी ओढणी त्याकडून खेचून घेतली आणि तिथून निघून गेले. मी काही करु शकले नाही कारण मी खूप घाबरलेल्या अवस्थेत होती,” असं या महिलेने सांगितलं आहे. या महिलेचा प्रसारमाध्यमांशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पप्पू यादव यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केलीय.

पतीची प्रकृती खालावल्यानंतर त्याला पाटण्यातील राजेश्वर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याला मृत्यू झाला. राजेश्वर रुग्णालयामध्येही माझ्या पतीकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही त्यामुळेच त्यांचा प्राण गेल्याचा आरोप या महिलेने केलाय. डॉक्टरांपासून ते कम्पाऊण्डरपर्यंत सर्वांच्यात बेजबाबदार वागण्यामुळे माझ्या पतीचा जीव गेल्याचा आरोप या महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 3:25 pm

Web Title: covid positive husband begged for water i was molested while caring for him bihar woman narrates horror scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रशांत किशोर यांचं पंजाबमधलं भवितव्य अधांतरी; सल्लागार पदालाही रामराम ठोकण्याची चिन्हं
2 धक्कादायक! तरुणीला एकाच वेळी देण्यात आले लसीचे सहा डोस; डॉक्टरांची धावपळ
3 धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या पाच तासांमध्ये नवविवाहितेचा मृत्यू
Just Now!
X