लंडन : कोविड-१९ ची लस देण्यात आलेल्या लोकांपासून इतरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा इंग्लंडच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. लसीमुळे करोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान ३ आठवडे लागत असल्याने लोकांनी टाळेबंदीच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लसीकरण करण्यात आलेल्या लोकांपासून या प्राणघातक विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ शकत नाही, असे दर्शवणारा कुठलाही स्पष्ट पुरावा अद्याप मिळालेला नाही, असा इशाराही इंग्लंडचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. जोनाथन वान-टॅम यांनी दिला आहे. ‘कुणी लस घेतली आहे अथवा नाही याचा विचार न करता, प्रत्येकाने निर्बंध आणि सार्वजनिक आरोग्याबाबतच्या सूचना यांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण लसीमुळे संरक्षण मिळण्याची सुरुवात होण्यास किमान ३ आठवडे लागतात आणि विषाणूच्या संसर्गावर होणाऱ्या लसीच्या परिणामाची अद्याप आपल्याला कल्पना आलेली नाही’, असे जोनाथन म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 25, 2021 12:50 am