News Flash

“करोनावरची लस २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची शक्यता पण….”

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं मत

संग्रहित छायाचित्र

करोनावरची लस २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे पण त्यासोबत काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल असं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलं आहे. ठरलेल्या गतीप्रमाणे सगळं घडलं तर २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत करोनावरची लस येण्याची शक्यता आहे. मात्र लस आली तरीही काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल असं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हेल्थगिरी अवॉर्ड्स २०२० या कार्यक्रमात रणदीप गुलेरिया यांनी हे मत व्यक्त केलं आहे. मात्र लस आल्यानंतर सुरुवातीला या लशीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील लोकसंख्या लक्षात घेता सुरुवातील सगळ्या वर्गांपर्यंत लस पोहचवता येईल की नाही याबाबतच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यावं लागेल असंही मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रणदीप गुलेरिया यांना करोनावरची लस कधी येईल? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. सध्याच्या घडीला लस आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. जर सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर लस जानेवारी महिन्यापर्यंत येईल. मात्र सुरुवातीला लशीची कमतरता भासण्याची शक्यता आहे असं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 4:06 pm

Web Title: covid vaccine may available in india by jan 2021 but with challenges says aiims director randeep guleria scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 १०० दिवस रुग्णालयात राहून करोनाशी लढणाऱ्या काँग्रेस नेत्याला मोदींनी केला फोन, म्हणाले…
2 मोदी सरकारविरोधात राहुल गांधी आक्रमक; काढणार ट्रॅक्टर रॅली
3 वंचित बहुजन आघाडीची बिहार निवडणुकीत उडी; ‘या’ आघाडीसोबत लढवणार निवडणूक
Just Now!
X