08 March 2021

News Flash

भारतात २५० रुपयांना मिळू शकते सीरमची करोना प्रतिबंधक लस

चार कोटी डोस बनून तयार आहेत....

करोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठयाचा करार करण्यासंदर्भात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत. या लसीचे आतापर्यंत काही कोटी डोस बनून तयार झाले आहेत.

भारतात सीरमने या लसीला ‘कोविशिल्ड’ असे नाव दिले आहे. ‘कोविशिल्ड’च्या प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असू शकते. लसीच्या किंमतीसंदर्भात सीरम बरोबर सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असलेल्या सरकारमधील सूत्राने सांगितले. बिझनेस स्टँडर्डने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- भारतात एका व्यक्तीच्या लसीकरणासाठी ३० मिनिटं, तीन खोल्या अन्….. समजून घ्या संपूर्ण प्लान

“लस पुरवठयाच्या कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल” असे सूत्राने सांगितले. ‘कोविशिल्ड’ लसीचे आधीपासूनच चार कोटी डोस बनून तयार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले होते. महिन्याभरात आणखी १० कोटी डोसच्या उत्पादनाची योजना आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यूकेमध्ये या लशीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही कोविशिल्डला मान्यता मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:53 pm

Web Title: covid vaccine may cost two fifty per dose serum institute dmp 82
Next Stories
1 घटना ऐकून पोलिसही हादरले! नववीतील विद्यार्थिनीवर आठ तरुणांनी १३ दिवस केला बलात्कार
2 5 G सेवा ते मोबाइल उत्पादन, समजून घ्या पंतप्रधान मोदींचा भारतीय टेलिकॉम क्षेत्रासंबंधीचा दृष्टीकोन
3 India Mobile Congress 2020 : 5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…
Just Now!
X