News Flash

धक्कादायक! लसीचे अडीच लाख डोस असलेला कंटेनर आढळला बेवारस

ड्रायव्हर क्लिनर बेपत्ता; मध्य प्रदेशातील घटना

वातानुकूलित ट्रकमधून लसींची वाहतूक केली जाते. (हे छायाचित्र संग्रहित असून, प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेले आहे. )

देशात करोना लसीच्या तुटवड्यावरून रणकंदन सुरू आहे. लस उपलब्ध नसल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पुढे ढकललं आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात लसीकरण केंद्र लसीअभावी बंद ठेवले जात आहेत. असं असताना कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला एक कंटनेर बेवारस अवस्थेत आढळला आहे. मध्य प्रदेशात हा प्रकार समोर आला आहे. रस्त्याकडेला कंटेनर उभा होता, तर ड्रायव्हर आणि क्लिनर ठिकाणावरून बेपत्ता होते.

मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली बस स्थानकाजवळ लसींची वाहतूक कंटनेर उभा असलेला आढळून आला. बराच वेळ झाला तरी कंटेनर उभा असल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती करेली पोलिसांना दिली. कंटेनर रस्त्याकडेला उभा असून, ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरच्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यानंतर कंटेनरची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कंटेनरमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असल्याचं आढळून आलं. लसीच्या या डोसची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे.

“कंटेनरमध्ये २ लाख ४० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस आहेत. त्याची अंदाजित किंमत ८ कोटी इतकी आहे. पोलिसांनी ड्रायव्हरचा शोध घेण्यास सुरूवात केली. जेव्हा त्याच्या फोनचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन महामार्गालगत असलेल्या झाडाझुडपात सापडला. कंटेनर वातानुकूलित असल्याने आतील लसी सुरक्षित आहेत. पोलीस सध्या ड्रायव्हर आणि क्लिनरचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांचा ठावठिकाणा सापडत नाहीये,” अशी माहिती करेली पोलीस ठाण्याच पोलीस उपनिरीक्षक आशिष बोपाचे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 1:14 pm

Web Title: covid vaccines container truck with over 2 lakh covid 19 vaccine doses found abandoned in mp bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या धोक्यामुळे केंद्र सरकारकडून ३ ते २० मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा? जाणून घ्या काय आहे सत्य
2 कावेबाज चीन! भारतातील करोना संकट पाहता सीमेवर हालचालींना वेग
3 “पुढच्या आठवड्यात भारतात सर्वोच्च रुग्णवाढ होण्याची शक्यता”, केंद्रीय तज्ज्ञांनी दिला इशारा!
Just Now!
X