News Flash

करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच महिलेनं विजेच्या खांबालाच दिली धडक

धडक इतकी भीषण होती की विजेचा खांबही कोसळला

अपघातग्रस्त झालेली कार. (फोटो। ट्विटर)

कारने घरी परतणाऱ्या महिलेला रस्त्यातच कॉल आला. फोन पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. हे ऐकून कार चालवत असलेल्या महिलेला धक्काच बसला. धक्क्यात असतानाच महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार विजेच्या खांबावरच जाऊन धडकली. हा धडक इतकी जोरात होती की, विजेचा खांबही कोसळला.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात असलेल्या कडक्कलमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. कोल्लममधील आंचल भागात असलेल्या एका खासगी प्रयोगशाळेत स्वॅब देऊन ४० वर्षीय महिला घरी जात होती. त्याचवेळी प्रयोगशाळेतून महिलेला कॉल करण्यात आला. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोरील व्यक्तीने महिलेला सांगितलं. हे ऐकून कार चालवत असलेल्या महिलेला धक्काच बसला. त्यातच महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली आणि त्यानंतर कार पलटली.

आणखी वाचा- झोप उडवणारी वाढ! देशात २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; १,८४,३७२ करोना बाधित

अपघातानंतर महिला कारमधून बाहेर आली आणि रस्त्यावर येऊन बसली. महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. अपघातग्रस्त गाडीतून उतरून महिला रस्त्यावर येऊन थांबली. नंतर अग्निशमन दलाच्या अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी महिलेला पीपीई किट दिली. सुदैवाने महिला ११ वर्ष आणि ८ वर्षाच्या मुलांना घरीच ठेवलं होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आणखी वाचा- कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढला..

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. केंद्रानं जाहीर केलेली ही आकडेवारी भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ करोना बाधित आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 2:33 pm

Web Title: covid19 coronavirus updates kerala woman rams car into electric pole bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
2 घृणास्पद: प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला करायला लावलं किळसवाणं कृत्य
3 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण
Just Now!
X