करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने या गोळीची किंमतही जाहीर केली आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध आणलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. कंपनीने सांगितलं की २०० एमजीच्या ३४ गोळ्यांच्या पॅकेटची किंमत ३,५०० रुपये असेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्प्ष्ट केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस रोज घ्यावे लागतील.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेकडून या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली, असल्याचे मुंबईतील या कंपनीने सांगितले.

भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोना व्हायरसवर जे औषध प्रभावी ठरतंय, त्या औषधाचं आता भारतात उत्पादन होणार आहे. एवढंच नाही तर त्याची विक्रीही करता येणार आहे. त्या औषधाचं नाव आहे रेमडेसिवीर. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.