कोविड १९ हे चीनने जगाला दिलेलं बॅड गिफ्ट आहे अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. वुहानमधून या व्हायरसची सुरुवात झाली. मात्र हा व्हायरस चीनमधल्या इतर भागांमध्ये गेला नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वुहानमध्येच हा व्हायरस रोखणं हे चीनच्या हातात होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच करोनावर लस शोधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच चिनी विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी चीनवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. करोनाचं संकट जगात पसरु लागलं तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यातले वादच समोर येताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे. चीनने COVID 19 नावाचे बॅड गिफ्ट जगाला दिले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. तसंच अमेरिकेलाही याचा फटका बसला आहे. बहुतांश देशांनी लॉकडाउनही जारी केला आहे. त्यामुळे अनेक देशांना आर्थिक फटकाही बसला आहे. चीनमधलं वुहान हे करोनाचं केंद्र मानलं जातं. तिथूनच सगळ्या जगात हा व्हायरस पसरला. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. चीनने कोविड १९ हे जगाला दिलेलं बॅड गिफ्ट आहे असं त्यांनी म्हटलं आहे.