News Flash

Covid Crisis : गोव्यात रविवारपासून १५ दिवस राज्यव्यापी ‘कर्फ्यू’!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली घोषणा

देशात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. याचप्रमाणे करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात आज(शुक्रवार) घोषणा केली आहे.

कर्फ्यू कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, रेस्टॉरंट सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील. या संदर्भात उद्या विस्तृत आदेश काढला जाईल. असं देखील मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यात पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही. उद्या, (शनिवार) सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात आदेश जारी केले जातील.

गोव्यात १० मे पर्यंत शूटिंग बंद , ‘या’ मालिकाचं चित्रीकरण पुन्हा रखडलं!

देशात करोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. अशात महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेक मराठी मालिकांचं तसचं रिअ‍ॅलिटी शोचं चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलं. दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 10 मे पर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 6:43 pm

Web Title: covid19 state level curfew to be imposed in goa from may 9 till may 23 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना Positive असतानाही तो लग्नाला गेला, वरातीत नाचला अन् साऱ्या गावाला करोना देऊन आला
2 भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९६० मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला!
3 Corona Crisis: भारताला डेनामार्क, कुवैतकडून मदतीचा हात
Just Now!
X