करोनावर तयार करण्यात येत असलेल्या कोविशिल्ड लशीबद्दल एका स्वयंसेवकानं धक्कादायक आरोप केले होते. स्वयंसेवकानं आरोप केल्याने लशीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, चेन्नईतील स्वयंसेवकाने केलेले आरोप सिरमने फेटाळून लावले आहेत. सिरमने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
कोविशिल्डची लस घेतलेल्या चेन्नईतील एका स्वयंसेवकानं न्युरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप करत सिरम इन्स्टीट्यूट आणि अन्य काही जणांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच त्यांच्याकडून पाच कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. यासोबतच लसीची चाचणीही थांबवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, हे आरोप सिरमने फेटाळून लावले आहेत.
“कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकांसोबत झालेली दुर्दैवी नाही. मात्र, ही घटना कोविशिल्ड लसीमुळे घडलेली नाही. स्वयंसेवकासोबत झालेल्या प्रकारानंतर सीरम इन्स्टिट्यूटनंही सहाभूती व्यक्त केलेली आहे. सर्व नियम, मार्गदर्शक सूचना व प्रक्रियेचं काटेकोरपणे पालनं करण्यात आलेलं आहे. ही घटना लशीच्या चाचणीशी संबधित नाही, असं Data and Safety Monitoring Board and the Ethics Committeeम्हटल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटनं दिली आहे.
आणखी वाचा- कोविशिल्ड लशीबाबत अदर पुनावाला यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…
Covishield safe & immunogenic. Incident with the Chennai volunteer no way induced by the vaccine. All regulatory & ethical processes & guidelines were followed. Principal Investigator,DSMB&Ethics Committee stated it was non-related issue to vaccine trial: Serum Institute of India pic.twitter.com/Ecrpg0mndm
— ANI (@ANI) December 1, 2020
आणखी वाचा- करोना नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष
यापूर्वीही केला होता खुलासा
“पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि दुर्देवी आहेत. सिरम इन्स्टीट्यूटला त्यांच्या स्वंयसेवकांच्या वैद्यकीय स्थितीबाबत काळजी आहे. लसीची चाचणी स्वयंसेवकाची वैद्यकीय स्थिती यांचा अजिबात संबंध नाही,” असं स्पष्टीकरण सिरम इन्स्टीट्यूटकडून देण्यात आलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 1:17 pm