उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाय एकमेव अशी प्राणी आहे की जी ऑक्सिजन घेते व पुन्हा ऑक्सिजनच सोडते. त्यांनी हे देखील म्हटले की, गायीवरून जर थोड्यावेळ दररोज हात फिरवला तर श्वासासंबंधी आजार देखील बरे होतात. हेच कारण आहे की लोक गायीला गौमाता असे म्हणतात.

मुख्यमंत्री रावत यांनी हे देखील म्हटले की, गायीचे शेण आणि गोमूत्र हे देखील आपल्यासाठी लाभदायक आहे. किडनी आणि हृदयासाठी दोन्ही उपयुक्त आहेत. जर एखादा टीबीचा रूग्ण गायीच्या सान्निध्यात राहिला तर तो देखील बरा होतो. आता शास्त्रज्ञ देखील याबद्दल सांगत आहेत.

मुख्यमंत्री रावत यांचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी त्यांच्या या विधानावरून विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.