03 March 2021

News Flash

Video : नागरिकांना गोहत्या रोखण्याची शपथ देतायेत पोलीस

गोहत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आहेत.

(छायाचित्र सौजन्य -एएनआय)

उत्तर प्रदेश पोलीस एका मोहिमेअंतर्गत गावागावात जाऊन नागरिकांना गोहत्या रोखण्याची शपथ देत आहे. याशिवाय पोलीस कर्मचारी गोहत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचंही आवाहन करत आहे.


बुलंदशहर हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. याद्वारे गोहत्येचे परिणाम आणि नियमांबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली जात आहे. गावकऱ्यांसोबतच्या अशाच एका बैठकीत सहभागी होण्यासाठी मेरठमधील किठोर पोलीस स्थानकाचे एसएचओ प्रेम चंद शर्मा पोहोचले होते. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये गावकऱ्यांना गोहत्या रोखण्याची शपथ देताना ते दिसत आहेत. ‘आपण शपथ घेऊया की, गावात आणि गावाच्या आजूबाजूच्या परिसरात गोहत्या होऊ देणार नाही व जो कोणी गोहत्येमध्ये सहभागी असेल त्याचा सामाजिक बहिष्कार करु आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ, जय हिंद, जय भारत’ असं सांगताना ते दिसत आहेत.

बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयातून ३ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह सुमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारप्रकरणी २२ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या जितेंद्र मलिक ऊर्फ जितू फौजी याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे, तसंच पोलिसांनी 18 फरार आरोपींचं छायाचित्र जारी केलं असून या आरोपींची जंगम मालमत्ताही जप्त केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी गुरूवारी स्थानिक न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं, यामध्ये आरोपी योगेश राज आणि भाजपा युवा मोर्चाच्या नगराध्यक्षासह 76 आरोपींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 6:57 am

Web Title: cow slaughtering wont be allowed in our village nearby areas pledge administered to locals by up police
Next Stories
1 डॉ. सविता यांच्या मृत्यूनंतर ‘या’ देशात गर्भपातावरील बंदी उठवली
2 बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट, जपानहून बडोद्यात पोहोचले 20 ट्रॅक
3 हा पराभव भाजपासाठी धोक्याची घंटा नाही : प्रशांत किशोर
Just Now!
X