माकपच्या राज्य परिषदेच्या समारोपाच्या सत्राला हजर राहावे, असा  पक्षाच्या मध्यवर्ती नेतृत्वाने दिलेला आदेश ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी सोमवारी फेटाळून पक्षाला अधिकच कोंडीत पकडले आहे. राज्य नेतृत्वाशी तीव्र मतभेद निर्माण झाल्याने शनिवारी ते परिषदेतून तडकाफडकी निघून गेले होते.
राज्य परिषदेत करण्यात आलेल्या ठरावानुसार आपल्यावर पक्षविरोधी कार्यकर्ता असल्याचा शिक्का मारण्यात आला असून अद्यापही तो कायम आहे त्यामुळे आपण या परिषदेपासून दूर राहिलो आहोत, असे अच्युतानंदन (९२) यांनी म्हटले आहे. अच्युतानंदन यांची कृती गंभीर असल्याचे नमूद करून पक्षाच्या पॉलिट ब्युरोने त्यांना सोमवारी समारोपाच्या सत्राला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी हा आदेशही फेटाळून लावला.