News Flash

कम्युनिस्ट पक्ष आणि नक्षलवाद्यांचा मला मारण्याचा कट – ममता बॅनर्जींचा आरोप

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना बॅनर्जी यांनी राज्यातील प्रमुख विरोधक कम्युनिस्ट पक्षाला लक्ष केले.

| June 19, 2013 07:35 am

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी नक्षलवाद्यांच्या साथीने माझी हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना बॅनर्जी यांनी राज्यातील प्रमुख विरोधक कम्युनिस्ट पक्षाला लक्ष केले.
माझ्या हत्येचा कट रचण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी नक्षलवाद्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानंतर पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. मात्र, ते कधीच घडणार नाही, असा हल्ला बॅनर्जी यांनी केला. कामदुनी गावातील पीडित मुलीला भेटण्यासाठी मी सोमवारी तिथे गेले होते. त्यावेळीच मला मारण्याचा कट होता. त्यासाठी गावाबाहेरील अनेकजण त्या दिवशी गावात आले होते. गावातून परतल्यानंतर मला माझ्या सुरक्षारक्षकांनी माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे सांगितले. गुप्तचर विभागानेही माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिला आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 7:35 am

Web Title: cpim and maoists are plotting to kill me says mamata banerjee
टॅग : Cpi,Mamata Banerjee
Next Stories
1 धावत्या बसमध्ये आदिवासी तरुणीवर बलात्कार
2 सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
3 लष्कर-ए-तोयबाच्या धमकीमुळे गोव्यात सावधानतेचा इशारा
Just Now!
X