News Flash

Coronavirus: सीताराम येचुरी यांना पुत्रशोक

सीताराम येचुरींच्या मुलाचं करोनामुळे निधन

(फोटो सौजन्य: पीटीआय आणि ट्विटरवरुन साभार)

सीपीएमचे महासचिव सीताराम यचुरी यांचा जेष्ठ पुत्र आशिष यचुरी यांचं करोनामुळे निधन झालंय. गुरुवारी सकाळी गुडगावमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिताराम यचुरी यांनी एक ट्विट करत ही दु:खद बातमी दिली आहे.

दोन आठवड्यांपूर्नी आशिष यचुरी यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना आशिष यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र पहाटे आशिषच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचं जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

सीताराम यचुरी यांनी ट्वीट करत मुलाच्या निधनाची दु:खद बातमी दिली आहे. ” मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की माझा मोठा मुलगा आशिष यचुरी याचं करोनामुळे निधन झालं आहे. ज्यांनी आम्हाला एक आशा दिली, ज्यांनी त्याच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांचे, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि आमच्या पाठीशी उभं राहणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. ” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

येत्या जूनमध्ये आशिष ३५ वर्षांचे होणार होते. दिल्लीतील एका नावाजलेल्या वृतपत्रात वृत्त संपादक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 8:54 am

Web Title: cpim general secretary sitaram yechury elder son ashish yachury passed away due to covid kpw 89
टॅग : Coronavirus,Loksatta
Next Stories
1 ‘प्राणवायू’वरून दिल्ली-हरियाणात वाक्युद्ध
2 काहीही करून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करा!
3 कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक
Just Now!
X