माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि खासदार के. अनिरुद्ध यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी सुधारमा आणि पुत्र खासदार ए. संपत आणि कस्तुरी हे आहेत.

के. अनिरुद्ध १९६३, १९६५, १९७९ आणि १९८० मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. कामगार चळवळीत सक्रिय सहभाग असलेले अनिरुद्ध चिरायीनकीझू लोकसभा मतदारसंघातून १९६७ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांचा पराभव करून निवडून आले होते.