News Flash

माकप नेते उमानाथ यांचे निधन

माकपचे ज्येष्ठ नेते आर. उमानाथ यांचे बुधवारी येथे निधन झाले ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.

| May 22, 2014 04:45 am

माकपचे ज्येष्ठ नेते आर. उमानाथ यांचे बुधवारी येथे निधन झाले ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. त्यांच्या पत्नी पप्पा उमानाथ व एक कन्या नेत्रावती यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या कन्या यू. वासुकी व यू. निर्मलाराणी या माकपच्या सदस्य  आहेत.
उमानाथ हे कामगार संघटनेचे नेते व कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. माकप पॉलिट ब्यूरोचे सदस्य व सिटूचे अखिल भारतीय उप महासचिव होते. तामिळनाडूतील नागपट्टीनमचे ते आमदार होते. ब्रिटिश काळात त्यांनी भूमिगत राहून कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवण्याचे काम केले त्यामुळे त्यांना १९४० मध्ये अटक झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:45 am

Web Title: cpim leader umanath passes away
Next Stories
1 निवडणूक अधिकाऱयाने ‘इव्हीएम’ नेले घरी; मुलाने फेसबुकवर टाकला फोटो!
2 होस्नी मुबारक यांना तीन वर्षांचा कारावास
3 पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ६० दहशतवादी ठार
Just Now!
X