मोदी सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून गेल्या १२ महिन्यात काँग्रेसचीच धोरणे राबवत आहे, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सत्तेवर येण्याचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या भाजपवर केला आहे.
लोकांचा सरकारवरील विश्वास आणि जगाचा भारताबद्दलचा आशावाद आजवरच्या सर्वोच्च पातळीवर आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माकपने म्हटले आहे की, मोदी परदेशातून भारताकडे पाहतात, तेव्हाच त्यांना असे दिसते, परंतु जमिनीवरील वस्तुस्थिती वेगळी आहे.शासन म्हणजे पूर्तता करणे होय आणि ती फक्त आश्वासने आणि सोयिस्कर यंत्रणांबाबतची नाही. त्यामुळे, पूर्वी जे काही चुकीचे झाले होते, तेच पुढेही सुरू आहे. काँग्रेसचीच धोरणे अजून कायम आहेत, असे मापकचे खासदार मोहम्मद सलीम यांनी पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीनंतर
सांगितले.