20 October 2020

News Flash

पाकिस्तानी मंत्र्याने केले धोनीचा अपमान करणारे ट्विट, म्हणाला…

भारतीय चाहते या ट्विटवर चांगलेच संतापले असून त्यांनी या मंत्र्याचा चांगलाच समाचार घेतला आहे

विश्वचषक २०१९ मधील उपांत्य फेरीतील सामना भारताने १८ धावांनी गमावला. महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या जुंजार खेळीनंतरही भारताचा पराभव झाल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. धोनीच्या या झुंजार खेळीचे अगदी पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही कौतूक केले आहे. मात्र भारत स्पर्धेतून बाहेर गेल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा आनंद पोटात मावेनासा झाला आहे. याच पाकिस्तानी चाहत्यांपैकी एक असणारे इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील नेते फवाद अहमद चौधरी यांनी ‘धोनीच्या नशिबात अशाप्रकारे अपमान होऊन बाहेर पडणेच होते’, असे वादग्रस्त विधान केले आहे.

पाकिस्तान सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या फवाद यांनी न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्यानंतर एक ट्विट केले. ‘पाकिस्तानी लोकांचे नवे प्रेम म्हणजे न्यूझीलंड’ असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करुन त्यांना स्पर्धेबाहेर काढण्याने फवाद यांनी आनंदाच्या भरात हे ट्विट केले.

फवाद यांच्या या ट्विटवर भारतीय ट्विपल्सने त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्याला समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया ट्विट केल्या. फवाद यांनी आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करत त्यांच्या फॉलोअर्सने केलेल्या भारत तसेच धोनी विरोधी ट्विटही रिट्विट करत त्या ट्विटला सहमती दर्शवली आहे. ‘फिक्सींग आणि पक्षपात करुन सज्जनांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला डाग लावणाऱ्या धोनीला अशाच प्रकारे अपमानजनक निरोप मिळायला हवा,’ हे ट्विट फवाद यांनी रिट्वीट केले आहे.

दरम्यान फवाद यांच्या या ट्विटवरुन भारतीयांनी त्यांना ट्रोल केले आहे.

१)
लिहायला शिका आधी

२)
तरी ते तुम्हाला पैसे देणार नाही

३)
लिहायला शिका

४)
टोमॅटो देतील

५)
अती होतयं

६)
कर्ज देतायत का बघा

दरम्यान, भारताचा पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता १४ तारखेला लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ विश्वविजेता होण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 5:05 pm

Web Title: cricket world cup dhoni deserved the disgraceful exit says pakistan minister fawad chaudhry scsg 91
Next Stories
1 WC 2019 : फायनलमध्ये खेळू अशी कल्पनाही केली नव्हती – मॉर्गन
2 ऋषभ पंतवरून युवराज सिंगने पिटरसनला झापले
3 ‘अमित शाह म्हणाले, भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार’
Just Now!
X