27 February 2021

News Flash

करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून भज्जीनं व्यक्त केली चिंता, म्हणाला…

करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे

हरभजन सिंग

दिवसागणिक देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह यांनी वाढत्या रुग्णसंक्येवरुन मोठा प्रश्न उपस्तित केला आहे.

भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह याने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. एएनआयनं शुक्रवारी सकाळी मागील २४ तासांतील करोनाबाधित रुग्णसंख्येची माहिती दिली होती. त्या ट्विटला रिप्लाय देताना भज्जीनं चिंता व्यक्त करताना प्रश्न उपस्थित केला आहे. भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘ हे जर असंच सुरु राहिलं तर भारतात लवकरच एका दिवसात एक लाख रुग्णही सापडू शकतात… कोणाला काळजी आहे का?’

हरभजन सिंहच्या या ट्विटमध्ये चिंता आणि सरकारला प्रश्नही दिसून येतो. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. हरभजनने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये चिंता तर व्यक्त केलीच आहे. शिवाय त्याने नाव न घेता सरकारवर टीकाही केल्याचे दिसत आहे. कारण सध्याच्या घडीला देशभरात करोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी तर करोनाच्या रुग्णांना बेडही मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा पुरवण्यात सरकार कितीही प्रयत्न करत असली तरी ती तोकडी असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता करोना सर्वांची पाठ सोडणार तरी कधी? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशात एक हजार १२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ इतकी झाली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८४.८३ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 4:50 pm

Web Title: cricketer harbhajan singh commenting after found huse coronavirus patients last 24 hrs nck 90
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये सेक्स टॉइजच्या विक्रीत ६५ टक्के वाढ, मुंबई, पुणे ‘या’ स्थानावर
2 राम मंदिर भूमिपूजनासाठी ही ‘अशुभ वेळ’ -शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती
3 भाजपा नेता म्हणतो, “राम मंदिर बांधायला घेतल्यावर करोना संपेल”
Just Now!
X