News Flash

स्पॉट फिक्सिंग – श्रीशांत, अंकित चव्हाणला जामीन

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

| June 10, 2013 08:11 am

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या दोघांसह एकूण १८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया या क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना १६ मे रोजी मुंबईमधून अटक केली होती. या दोघांसह अजित चंडिला यालाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याने जामीनासाठी अर्ज केलेला नसल्यामुळे त्याला अजून जामीन मिळालेला नाही. श्रीशांत, चंडिला आणि चव्हाण यांच्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 8:11 am

Web Title: cricketers s sreesanth and ankit chavan granted bail by a delhi court in ipl spot fixing case
टॅग : Ipl,Spot Fixing,Sreesanth
Next Stories
1 नरेंद्र मोदींना कुणाचे पाठबळ?
2 अडवानींच्या मनधरणीसाठी मोदीही मैदानात
3 अॅपलचा आयफोन ६ दाखल होतोय!
Just Now!
X