व्हिडीओ स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच स्वीकारताना स्पष्ट दिसत असलेले बिहारचे माजी मंत्री अवधेशप्रसाद कुशवाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे.

कार्यकारी दंडाधिकारी राजीव मोहन सहाय यांच्या अहवालावरून कुशवाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी सांगितले. लाच स्वीकारत असतानाची व्हिडीओ फीत प्रसारित झाल्यानंतर कुशवाह यांची मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून जद(यू)ने  पूर्व चंपारण जिल्ह्य़ात त्यांना दिलेली उमेदवारीही मागे घेतली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी आपल्याविरुद्ध कारस्थान रचल्याचा आरोप कुशवाह यांनी केला आहे. राधामोहन सिंह यांचे निकटचे सहकारी श्यामबाबू प्रसाद यांचा विजय निश्चित व्हावा यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचेही कुशवाह म्हणाले.