27 September 2020

News Flash

हाँगकाँगमधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित

जनक्षोभामुळे सरकारचा निर्णय; चीनची सहमती

जनक्षोभामुळे सरकारचा निर्णय; चीनची सहमती

हाँगकाँगमधील गुन्हेगारांना चीनच्या ताब्यात देण्याबाबतचे वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक अखेर तेथील सरकारने स्थगित केले आहे. या विधेयकाविरोधात लोकांनी जोरदार निदर्शने केली होती, तसेच तेथील पार्लमेंटवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता.

जग हाँगकाँगमधील घटनांकडे बघते आहे असे सांगून अमेरिकेनेही डोळे वटारले होते. त्यामुळे हाँगकाँगमधील चीन नियंत्रित सरकारने एक पाऊल माघारी घेतले आहे. विधेयक स्थगितीला चीननेही हिरवा कंदिल दिला आ हे हाँगकाँगच्या चीन समर्थक नेत्या कॅरी लाम यांच्यावर हे विधेयक रद्द करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सहकारी व सल्लागारांकडून दबाव आला होता.

लाम यांनी शनिवारी वार्ताहरांना सांगितले, की सरकारने हे घटनादुरूस्ती विधेयक स्थगित केले असून समाजातील सर्व घटकांशी संवाद साधूनच त्यावर मार्ग काढला जाईल. समाजातील लोकांची मते यात जाणून घेतली जातील.

या विधेयकासाठी कोणतीही मुदत ठरवण्याचा आमचा विचार नाही, त्यासाठी सल्लामसलत केली जाईल. विधिमंडळाच्या कायदा सल्लागार पथकाशी चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले. १९९७ मध्ये हाँगकाँगचे हस्तांतरण चीनकडे करण्यात आल्यानंतरच्या काळातील सर्वात मोठी निदर्शने बुधवारी झाली होती. त्याआधी गेल्या रविवारी दहा लाख लोकांचा सहभाग असलेला मोर्चाही निघाला होता.

विधेयकाला विरोध होत असल्याने बीजिंगमधील कम्युनिस्ट पक्षाचे नेतेही अस्वस्थ असून लाम यांनी सरकारी  संकुलात शनिवारी पत्रकार परिषद घेतली. दी साउथ चायना मॉर्निग पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार लाम यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या सल्लागारांची तातडीची बैठक घेतली. शेनझेन येथे चिनी अधिकाऱ्यांचीही बैठक झाली. निदर्शकांनी येत्या रविवारी पुन्हा जंगी  शक्तिप्रदर्शन करीत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. गेले अनेक महिने विरोध असतानाही  हे विधेयक मागे घेण्यास लाम यांनी नकार दिला होता. शुक्रवारी त्यांच्या पक्षातील सदस्यांनीच त्यांना दूरध्वनी करून लोकक्षोभ विचारात घेता विधेयक तूर्त मागे घेण्यास सांगितले होते.

‘शहाणपणाचा मार्ग’

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, बीजिंग समर्थक अ‍ॅन शियांग यांनी सांगितले,की लोकांना शांत करण्यासाठी विधेयक स्थगित करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 12:56 am

Web Title: crime in hong kong
Next Stories
1 दहशतवादाचा आशियाला सर्वाधिक धोका
2 ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी
3 अर्थव्यवस्था पाच लाख कोटींवर नेणे शक्य!
Just Now!
X