News Flash

गुगल सर्च करून रचला हत्येचा कट! महाराष्ट्रातून घरी परतलेल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं

लॉकडाउनमुळे तो महाराष्ट्रातून पुन्हा उत्तर प्रदेशातील आपल्या घरी परतला होता. त्याच्या घरी जाण्यामुळे पत्नीला तिच्या प्रियकराशी भेटता येत नव्हतं... त्यातून त्यांनी गुगलवर हत्या कशी करायची

लॉकडाउनमुळे तो महाराष्ट्रातून पुन्हा उत्तर प्रदेशातील आपल्या घरी परतला होता. त्याच्या घरी जाण्यामुळे पत्नीला तिच्या प्रियकराशी भेटता येत नव्हतं... त्यातून त्यांनी गुगलवर हत्या कशी करायची याचा शोध घेतला... आणि प्लान तयार केला

लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील स्वतःच्या घरी परतलेल्या एका व्यक्तीची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील खेडीपूर भागात ही घटना घडला आहे. प्रकरणाचा तपास करताना पोलीसही चक्रावून गेले. महिलेनं पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क गुगल सर्च करून कट रचल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील खेडीपूरा भागात १८ जून रोजी ही घटना घडली. तबस्सूम असं आरोपी महिलेचं नाव असून, आमिर असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. तर तबस्सूमचे इरफान नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. १८ जून रोजी तबस्सूमने आमिरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना माहिती दिली. त्याचा मृत्यू कसा झाला याविषयी आपल्या माहिती नसल्याचंही ती म्हणाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास सुरू केला.

हेही वाचा- …अन् मुलांसमोरच पत्नीने किचनमधून चाकू आणून केली पतीची हत्या

तपासादरम्यान, तबस्सूमनेच प्रियकर इरफानला सोबत घेऊन पती आमिरची हत्या केल्याचं उघड झालं. आमिर हा महाराष्ट्रात कामाला होता. याच काळात त्यांच्यासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली. याच काळात विश्वासू असलेल्या इरफान आणि तबस्सूम यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, लाकडाउन लागल्याने आमिर महाराष्ट्रातून घरी परतला. आमिर घरी परतल्याने तबस्सूम आणि इरफान यांच्या भेटीत मोठा अडथळा निर्माण झाला. भेटता येत नसल्याने तबस्सूम आणि इरफानने आमिरची हत्या करायचं ठरवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आमिरला दम्याचा त्रास आहे आणि त्याला दररोज औषधी घ्यावी लागते. तबस्सूमने आमिर दम्याच्या नेहमीच्या गोळ्या दिल्याच नाही. त्याऐवजी तिने दुसऱ्याचं गोळ्या दिल्या. ज्यामुळे आमिर बेशुद्ध झाला. त्यानंतर तबस्सूम आणि इरफानने रात्री आमिरची हत्या केली. दोघांनी आमिरचे हातपाय ओढणीने बांधले आणि त्यानंतर इरफानने त्यांच्या डोक्यात हातोड्यानं हल्ला केला. आमिरचा मृत्यू होईपर्यंत इरफान हातोड्याने मारत होता, असं पोलिसांनी सांगितलं.

VIDEO: लोणावळ्यात वृद्ध दांपत्याचे हात पाय बांधून दरोडा; पहा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

हत्या केल्यानंतर तबस्सूमने यांची माहिती पोलिसांना दिली, मात्र तपासाची दिशा भटकवण्याचा प्रयत्न ती करत होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरीच्या प्रयत्नातून हत्या करण्यात आली का? याचाही तपास पोलिसांनी केला. पण, घटनास्थळी आढळून आलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांना तबस्सूमवर शंका आली.

असा उघड झाला कट

पुणे : दुहेरी हत्याकांडाचे गूढ कायम ; सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता!

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली. पोलिसांनी तबस्सूमच्या कॉलची माहिती घेतली. तिने कुणाला कॉल केले याचा तपास करत असताना तबस्सूम आणि इरफान यांच्यात बऱ्याच वेळा संभाषण झालं असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तबस्सूमने गुगलवर काय काय शोधलं (गुगल सर्च हिस्ट्री) याचा शोध घेतला. त्यात तबस्सूमने हत्या कशी करायची आणि हात कशा पद्धतीने बांधायचे, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आदी माहिती शोधली असल्याचं तपासात दिसून आलं. त्यानंतर तबस्सूमला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने गु्न्ह्याची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 9:57 am

Web Title: crime news up crime news lockdown crime woman googles murder plan kills husband with lovers help bmh 90
Next Stories
1 देशात आढळले ५२,२५६ नवीन करोना रुग्ण; गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या
2 …अन् मुलांसमोरच पत्नीने किचनमधून चाकू आणून केली पतीची हत्या
3 मुदसीर पंडितसह ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची मोठी कारवाई
Just Now!
X