30 May 2020

News Flash

सिंगापूरमध्ये भारतीयांवर गुन्हा

इतरांना घरात आणून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

संग्रहित छायाचित्र

सिंगापूरमध्ये कोविड १९ निर्बंधांचे उल्लंघन केल्याने दहा भारतीय नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात  आले असून त्यांच्यात काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही जण भाडय़ाच्या खोलीत एकत्र जमले होते.

५ मे रोजी तीन जणांच्या गटाने इतर सात जणांना त्यांच्या सदनिकेत चहापानासाठी बोलावले होते. त्यात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. कोविड १९ निर्बंधानुसार या लोकांनी एकत्र जमून नियमांचे उल्लंघन केले. त्यांना १० हजार सिंगापूर डॉलर्स वा सहा महिने तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. गुन्ह्य़ात सामील असलेल्यात अविनाश कौर ही महिला, नवदीप सिंग व सजनदीप सिंग यांचा समावेश आहे. त्यांच्यावर इतरांना घरात आणून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:14 am

Web Title: crimes against indians in singapore abn 97
Next Stories
1 मुलीने आजारी वडिलांना सायकलवर बसवून पार केलं १२०० किमी अंतर, इवांका ट्रम्पही भारावल्या
2 दुर्दैवी! नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण, डॉक्टरही हळहळले
3 “…अन्यथा भारतातील करोना रुग्णांची संख्या ३६ ते ७० लाखांवर गेली असती”
Just Now!
X