29 October 2020

News Flash

धक्कादायक! नदीमध्ये पोहणाऱ्या युवकाला मगरीने गिळलं

नदीमध्ये मगरीने एका १८ वर्षीय युवकाला जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना घडली.

मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील चंबल नदीमध्ये मगरीने एका १८ वर्षीय युवकाला जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र तोमर असे मृत युवकाचे नाव आहे. नरेंद्र नागरा घाट भागातून वाहणाऱ्या चंबल नदीत पोहोण्यासाठी उतरला होता. त्यावेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गावकऱ्यांनी नरेंद्रला मगरीच्या जबडयातून सोडवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. आजोबांच्या अत्यंविधीवरुन परतलेला नरेंद्र पोहोण्यासाठी नदीत उतरला होता. चंबल नदीमध्ये मगरींचे वास्तव्य आहे हे नरेंद्र तोमरला माहीत होते.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाणबुडयांना नदीपर्यंत पोहोचण्यासाठी सहा तासाहून जास्त वेळ लागला. मगरींकडून धोका असल्यामुळे पाणबुडे सुद्धा खोल पाण्यात जाण्यास तयार नव्हते. चंबल नदीत ५०० पेक्षा जास्त मगरींचे वास्तव्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 12:36 pm

Web Title: crocodile swallows youth alive in morena madhya pradesh chambal river dmp 82
Next Stories
1 Kathua Gang Rape and Murder Case: जाणून घ्या काय आहे कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरण?
2 गिरीश कर्नाड यांच्या निधनानंतर कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
3 राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेने चार जणांचा मृत्यू
Just Now!
X