News Flash

सीआरपीएफने केला १५ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुकमा हल्ल्याचा घेतला बदला

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान हुतात्मा झाले होते.

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान हुतात्मा झाले होते.

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) छत्तीसगडमध्ये केलेल्या कारवाईत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा केला आहे. परंतु, अद्याप एकही मृतदेह हाती लागलेला नाही. सीआरपीएफने मंगळवारी याबाबत घोषणा केली. गेल्या तीन दिवसांपासून ही मोहीम सुरू होती. हे ऑपरेशन दि. १३ ते १५ मेच्या दरम्यान राबवण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाल्याचेही वृत्त आहे. त्याचबरोबर दोन जवान जखमी आहेत. वायरलेसवर झालेल्या चर्चेवरून पोलिसांना नक्षल्यांच्या ठावाठिकाणाबाबत समजले होते.

दि. २४ एप्रिल रोजी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्यातील काही नक्षलवादीही या कारवाईत मारले गेल्याचे बोलले जाते. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान हुतात्मा झाले होते. या वेळी सुमारे २५० नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. या नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक हत्यारे होती. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार परिसरातील ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना साथ दिल्याचे बोलले जाते. हे जवान तेथे रस्ते बनवण्यासाठी प्रशासनाला मदत करत होते.

यापूर्वी ८ नक्षलवादी पकडले गेल्याचे वृत्त आले होते. या नक्षलवाद्यांवरही सुकमा हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप होता. सुकमा हल्ल्यानंतर त्या रस्त्याचेही काम बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी यासंबंधी काही छायाचित्रेही जारी केली आहेत. याची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:52 pm

Web Title: crpf 15 maoists naxalite killed three days operation encounter chhattisgarh sukuma attack
Next Stories
1 वाढदिवशीच सापडला आयएएस अधिकाऱ्याचा मृतदेह
2 लोअर बर्थसाठी भरावी लागणार जादाची रक्कम?
3 ‘केजरीवाल यांना ‘सरकार ३’ पाहण्यात रस, स्वत:च्या कार्यालयात जाण्यास वेळ नाही’