छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपुर परिसरातील कोंदापारा मार्गावर नक्षलवाद्यांनी केलेल्या भू-सुरूंग हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.अरनपूर-कोंदापारा मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी केंद्रीय सुरक्षा दलातील २३० ही तुकडी कार्यरत होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या भू-सुरूंग स्फोटात एकूण दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमी जवानांना त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या साह्याने रायपूरला हलविण्यात आले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणास विरोध दर्शविण्यासाठी नक्षल्यांनी हा हल्ला घडवून आणला. यापूर्वी देखील नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामकाजामध्ये अडथळा आणण्यासाठी अनेकदा हल्ले घडवून आणले आहेत. CRPF jawan injured after an IED blast by naxals in Dantewada district of Chhattisgarh.— ANI (@ANI_news) July 27, 2016