News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये ‘सीआरपीएफ’च्या छावणीवर दहशतवादी हल्ला; तीन जवान जखमी

जम्मू- श्रीनगर महामार्गावर पोलीसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती.

Jammu Srinagar highway : सध्या या परिसरात मोठ्याप्रमाणावर गोळीबार सुरू असून नजीकच्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील कूद परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जम्मू- श्रीनगर महामार्गावर पोलीसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबारीला सुरूवात केली. सध्या या परिसरात मोठ्याप्रमाणावर गोळीबार सुरू असून नजीकच्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 6:23 pm

Web Title: crpf police camp attacked on jammu srinagar highway one terrorist killed three crpf jawans injured
टॅग : Terrorist Attack
Next Stories
1 नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही कायम- अरूण जेटली
2 नरेंद्र मोदींना ‘जगाचा पंतप्रधान’ बनवावे; लालूप्रसाद यादव यांची खोचक टीका
3 मिग-२७ विमान घरावर कोसळले; तीन जखमी
Just Now!
X