भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वीपणे घेतली आहे. क्रायोजेनिक सीई २० असे या इंजिनाचे नाव आहे. ही चाचणी ६४० सेकंदांची होती व ती अतिशय महत्त्वाची कामगिरी आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले.
महेंद्रगिरी येथे सायंकाळी सव्वापाच वाजता ही चाचणी घेण्यात आली असून, जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकासाठी हे इंजिन वापरले जाणार आहे. या इंजिनाच्या अल्पावधीच्या दोन चाचण्या यापूर्वी यशस्वी झाल्या आहेत. मिक्स्श्चर रेशो कंट्रोलरसह ही चाचणी केली आहे.
या चाचणीमुळे भारतीय अवकाश संशोधनाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.

 

काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी सुरक्षा दलाने हाती घेतलेल्या दोन वेगवेगळ्या मोहिमांत हिजबुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक केली, तसेच दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण नष्ट केले.
पोलीस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त मोहिमेत शोपियन जिल्ह्य़ातील कनिहामा खेडय़ातील रहिवासी अबीद भट याला हब्दीपोराजवळ पकडण्यात आले.