News Flash

सीटी स्कॅन, इमॅजिंग टेस्टच्या अतिरेकाने कर्करोगाची भीती

अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात किरणोत्साराचा वापर केला जातो.

नवी दिल्लीतील डॉक्टरांचा दावा

शरीराच्या अंतर्गत भागात झालेला आजार तपासण्यासाठी आणि त्यानंतर रोगनिदान करण्यासाठी डॉक्टर अनेकदा रुग्णाला सीटी स्कॅन किंवा इमॅजिंग टेस्ट करायला सांगतात. त्यामुळे योग्य रोगनिदान होते, पण त्याचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक आहे. सीटी स्कॅन व इमॅजिंग टेस्टद्वारे प्रसारित होणाऱ्या किरणोत्सारामुळे कर्करोग होऊ शकतो, असा दावा नवी दिल्लीतील डॉक्टरांनी केला आहे.

नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत संशोधन केले. ‘‘विविध कारणांनी कर्करोग होत असला, तरी जगभरात १० टक्के कर्करोग होण्याची कारणे किरणोत्सार हे आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात किरणोत्साराचा वापर केला जातो. वारंवार या वैद्यकीय चाचण्या केल्या किंवा किरणोत्साराची मात्रा अधिक असेल, तर कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे,’’ असे सर गंगाराम रुग्णालयाच्या सीटी आणि एमआरआय विभागाचे अध्यक्ष डॉ. टी.बी.एस. बुक्सी यांनी सांगितले.

कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यापूर्वी रुग्णाने डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. एखादी वैद्यकीय चाचणी करणे खरेच गरजेचे आहे का किंवा ही चाचणी नाही केली की चालू शकेल का, असे प्रश्न रुग्णाने डॉक्टरांना विचारणे गरजेचे आहे, असे बुक्सी यांनी सांगितले.

कर्करोगाचा धोका कमी व्हावा यासाठी रुग्णालयात कमी किरणोत्साराचा मारा करणारी यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. सर गंगाराम रुग्णालयात नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले सीटी स्कॅनर बसविण्यात आले आहे.

या स्कॅनरमधून किरणोत्साराचा मारा कमी होतो आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका नसल्याची माहिती बुक्सी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 1:40 am

Web Title: ct scans and imaging tests increase the risk of cancer
टॅग : Cancer
Next Stories
1 नितीशकुमार उर्मट!
2 शांतता, सुरक्षेच्या आव्हानाला  तोंड देण्यास संयुक्त राष्ट्रसंघ अपयशी ; सुषमा स्वराज यांची टीका
3 दादरी हत्या प्रकरणावरून राजकारण
Just Now!
X