14 December 2017

News Flash

काश्मीर खोऱ्यातील संचारबंदीचे अब्दुल्ला यांच्याकडून समर्थन

संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न

पीटीआय, श्रीनगर | Updated: February 15, 2013 4:57 AM

संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला नसता तर र्निबध लादण्याची गरजच राहिली नसती, असे मत व्यक्त करून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खोऱ्यात जारी करण्यात आलेल्या संचारबंदीचे समर्थन केले आहे.
खोऱ्यात निर्माण झालेल्या या स्थितीत शांततेचा भंग करण्याचा निर्धार केलेले घटक आमच्यामध्ये नसते, तर र्निबध लादण्याची गरज भासली नसती, असेही अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. गुरू याच्या स्मरणार्थ फुटीरतावादी शक्तींनी एक मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्री संचारबंदी पुन्हा जारी करण्यात आली.
संचारबंदीचे कठोरपणे पालन करण्यात येणार असून, शुक्रवारचा नमाज अदा करण्याचीही परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, स्थानिक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यावर कोणतेही र्निबध लादण्यात आलेले नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on February 15, 2013 4:57 am

Web Title: curfew in kashmir valley