29 May 2020

News Flash

दिल्ली हिंसाचार: अमित शाह अजून गप्प का? -ओवेसी

हिंसाचाराच्या घटनांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाणा

संग्रहीत

राजधानी दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून तीन दिवस घडलेल्या हिंसाचाराने ३३ जणांचा बळी घेतला तर १०० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप करत, दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. जमावाकडून घडवण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल, दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अमित शाह अद्याप सार्वजनिकरित्या एक शब्दही बोललेले नाहीत. असं ओवसींनी म्हटलं आहे.

“या सर्वातील महत्वाची व्यक्ती, केंद्रीय गृहमंत्री आणि दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अमित शाह बेफाम झालेल्या जमावाकडून घडवण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल अद्याप सार्वजनिकरित्या शब्दही बोललेले नाहीत. कदाचित काही उत्तरं असतील.” असं ओवसींनी ट्वटि केलं आहे.

आणखी वाचा – मध्यरात्री न्यायाधिशांची बदली, हा प्रकार लाजिरवाणा : प्रियंका गांधी

या अगोदर दिल्ली हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ओवेसींनी ही घटना देशासाठी लाजिरवाणी असल्याचं सांगितलं होतं. “मी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करतो, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकांना जीव गमावावा लागला. परदेशी पाहुणे भारतात आलेले असताना अशाप्रकारचा हिंसचार उफळणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे.”  असं ओवेसी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:39 pm

Web Title: custodian of delhis security amit shah hasnt uttered a public word yet on the ugly pirouette of maddened mobs asaduddin owaisi msr 87
Next Stories
1 अनैतिक संबंधातून पती, पत्नी आणि वो…तिघांचा मृत्यू, डॉक्टरने कुरिअर केले दागिने
2 “भाजपाला विरोध केल्यास मारले जाल किंवा तुरुंगात जाल”
3 पॉर्न साईट्सपासून दूर राहण्यासाठी सरकारच घेणार विद्यार्थ्यांची शाळा
Just Now!
X