महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले असताना त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे. दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली असून नागरीकांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅल सिलिंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गॅस सिलिंडरच्या किंमतीत साडेचार रूपये कमी करण्यात आले आहेत. हे नवे दर जानेवारी २०१८ पासून लागू होणार असल्याचे तेल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

दैनंदिन वापराच्या १४.२ किलोच्या गॅसची ४ रुपयांनी कमी करण्यात आली असून नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये अनुदानित गॅसची किंमत ४९५.६९ इतकी आहे. कोलकत्यामध्ये ही किंमत ४९८.४३, मुंबईमध्ये ४९३.३८ तर चेन्नईमध्ये ४८३.६९ इतकी आहे. त्याच्यप्रमाणे १९ किलो व्यावसायिक वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत १४५१ रूपयांहून १४४७ करण्यात आली आहे. म्हणजेच घरगुती वापराच्या गॅसची किंमत साडेचार रुपयांनी कमी झाली असून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये चार रूपयांची कपात करण्यात आली आहे. सध्या नागरीकांना एकूण १२ गॅसची सबसिडी मिळते. ही सबसिडी ३२५.६१ रूपये होती. त्यामध्येही ४.६१ रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरीकांना ३२० रुपये सबसिडी मिळणार आहे.