News Flash

लॉकडाउनमधील ‘सायकल गर्ल’ झाली पोरकी! वडिलांना घेऊन केला होता १२०० किमी प्रवास

बिहारमधील दरभंगा येथील ज्योती पासवान या मुलीने आपल्या वडिलांना सायकलवर बसऊन प्रवास केला होता

बिहारची सायकल गर्ल ज्योती कुमारी

करोना काळात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. गेल्यावर्षी लॉकडाउन झाल्यानंतर अनेक संसार उघड्यावर आले. तसेच स्थलांतरीत मजुरांचा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता. हे मजूर मिळेल त्या साधनाने हजारो मैलांचा प्रवास करून घरी जात होते. अंगावार काटा आणणारा तो प्रसंग होता. अनेकजण तर पायी घरी गेले होते. यावेळी बिहारमधील दरभंगा येथील ज्योती पासवान या मुलीने आपल्या वडिलांना सायकलवर बसऊन १२०० किमी प्रवास केला होता. त्यामुळे तिला ‘सायकल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाते.

दरम्यान, ‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानचे  वडील मोहन पासवान यांचे निधन झाले आहे. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योती पासवान गेल्यावर्षी तिच्या वडिलांना करोना काळात लॉकडाउनमध्ये सायकलवर बसऊन गुडगावहून दरभंगा येथे नेल्यामुळे चर्चेत आली होती. ज्योतीच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

आणखी वाचा- “कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्या नाहीत,” अदर पूनावालांविरोधात कोर्टात याचिका

विशेष म्हणजे गेल्या लॉकडाउन दरम्यान, जेव्हा सर्व काही बंद होते, तेव्हा लाखो लोक पायी किंवा मिळेल त्या वाहनाने घरी गेले होते. यामध्ये ज्योती देखील होती. दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा ब्लॉकमधील सिरहूली खेड्यातील १३ वर्षीय ज्योती लॉकडाउन दरम्यान तिच्या वडिलांना सायकलवर बसऊन गुडगावहून ८ दिवसांत दरभंगा येथे गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 1:47 pm

Web Title: cycle girl jyoti father dies of heart attack srk 94
टॅग : Bihar,National News
Next Stories
1 “अर्थमंत्रालयामध्ये लो ‘आयक्यू’वाली माणसं असून मोदींनाही अर्थव्यवस्थेबद्दल कळत नाही”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर
2 पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांचं मुख्यमंत्र्याविरोधात बंड; २० आमदार दिल्लीत दाखल
3 लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं
Just Now!
X